धुळे- ठाण्याकडे निघालेल्या मद्याची परस्पर विल्हेवाट लावणार्या बिहारातील दोघांची मुसक्या सोमवारी मोहाडी पोलिसांनी आवळत सुमारे 23 लाखांचा मद्यासाठा जप्त केला आहे. दिनेशकुमार लखन प्रसाद यादव (21, बांका, बिहार) व राजकुमार शंकर सैनी (30, रा.मोतीहारी, बिहार) अशी अटकेतील आरोपींचे नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून दहा लाखांच्या कंटेनरसह 23 लाखांची विदेशी दारू मिळून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, आरोपींनी नागपूरच्या बकार्डी कंपनीतून मालाची उचल करून ते ठाणे येथे डिलिव्हरी जात असताना त्यांनी दारू परस्पर विकण्याचा डाव आखला होता मात्र पोलिसांच्या जाळ्यात आरोपी अलगद अडकले.