धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबवले ; चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल

0

भुसावळ :- रस्त्याने पायी जात असलेल्या विवाहित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबवल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार रेखा गणेश राणे (49, लक्ष्मीनगर, जामनेर रोड) या 15 रोजी सायंकाळी 6.30 वाजता घराकडे पायी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले. चार ग्रॅम वजनाचे व 10 हजार रुपये किंमतीचे मणी-मंगळसूत्र लांबवल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय आनंदसिंग पाटील करीत आहे.