धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र लांबवले : पाचोरा शहरातील घटना

Dhoom style mangalsutra of married woman in Pachora extended पाचोरा : बाईकवरून धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी पाचोरा शहरातील 31 वर्षीय विवाहितेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे लांबवल्याची घटना सोमवार, 10 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

धूम स्टाईल लांबवली पोत
तक्रारदार विवाहिता सारीका मनोज पाटील (31, न्यू शिंदे स्कूलसमोर, पाचोरा) या मुलीसह रेस्ट हाऊस रस्त्यावरून पायी जात असताना निकीता टेलर यांच्या दुकानाजवळ स्प्लेंडर दुचाकीवरून धूम स्टाईल आलेल्या दोघा भामट्यांनी विवाहितेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवत पोबारा केला. विवाहितेने आरडा-ओरड केला मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले. विवाहितेच्या तक्रारीनुसार दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहेतह.