भुसावळ : शहरात यावल रस्त्यावर चोरट्यांनी धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातून पोत लांबवली. ही घटना बुधवार, 23 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
चोरटे दुचाकीवरून पसार
शहरातील गडकरी नगरातील रहिवासी असलेली विशाखा शिंदे (रा.गडकरी नगर, भुसावळ) या फैजपूर येथे शिक्षिका असून त्या बुधवार, 23 रोजी सायंकाळी फैजपूर येथून रीक्षाने आल्या. त्या गांधी पुतळ्याजवळ उतरत असताना दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी मंगळसूत्र लांबवत पलायन केले. काहींनी चोरट्यांचा पाठलाग केला मात्र चोरटे पसार झाले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसांना माहिती कळवल्याचे त्यांनी सांगितले.