धुळे : धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातील सोसाखळी लांबवणार्या चोरट्यांच्या धुळे शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मुसक्या आवळल्या आहेत. बाजीराव वाघ (42) व सनी रमेश चव्हाण (19, दोन्ही रा.साक्री रोड, फुले नगर, मोगलाई, धुळे) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
24 तासात गुन्ह्याची उकल
साक्री रोड भागातील महिला ताराबाई माधवराव कुंडल या शुक्रवारी कचरा फेकण्यासाठी घराबाहेर पडताच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली होती. काही कळण्याआत चोरटे पसार झाले. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुरनं.162/2021, भादंवि 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, हवालदार भिकाजी पाटील, मच्छिंद्र पाटील, नाईक योगेश चव्हाण, कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी, निलेश पोतदार, राहुल गिरी, अविनाश कराड, प्रदीप ढिवरे, राहुल पाटील आदींच्या पथकाने उघडकीस आणला.