रावेर- तालुक्यातील धूरखेडा येथील 30 वर्षीय विवाहितेने तापी पात्रात उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र धुरखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बेलदार यांनी पुलावरून उडी घेऊन विवाहितेचे प्राण वाचवत तिला आप्तेष्टांच्या ताब्यात दिले. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिंप्री-नांदू तापी नदीच्या पुलावर ही घटना घडली. धुरखेडा येथील तीस वर्षीय महिला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धुरखेडा येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र जलपातळी कमी असल्याने पुलावरून जाणार्या वाहनधारकांना ही महिला पाण्यावर हात मारतांना दिसुन आली त्याचवेळी ज्ञानेश्वर बेलदार यांनी तत्काळ उडी मारून हिलेला जिवंत बाहेर काढले. या विवाहितेनेआत्महत्या करण्याआधी पुलाच्या कठड्यावर चिठ्ठी लिहिली असल्याचे समजते.