धूरफवारणीसाठी 71 लाख

0

पुणे । पावसाळ्यामुळे शहरात पसरलेल्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करण्यात येणार्‍या धूरफवारणी, मशीन खरेदी आणि त्यासाठी वाहन भाडेतत्वावर घेण्यासाठी स्थायी समितीने 71 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. अर्थसंकल्पात या कामासाठी तरतूद नसल्याने ठेकेदारी पद्धतीने नेमलेल्या सेवकांच्या वेतनासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधून वर्गीकरणकडून हे पैसे घेण्यात आले आहेत. यामध्ये कोल्ड व थर्मल फॉगिंगसाठी प्रत्येकी 25 लाख, टेम्पो भाडेतत्वावर घेण्यासाठी 21 लाख 60 हजार असा एकूण 71 लाख 60 हजारांचा खर्च प्रशासनाने अपेक्षित धरला आहे.