धृतीलचे उपकरण राष्ट्रीय सायन्स प्रदर्शनात

0

उपकरणाची राज्यस्तरावर दोनदा निवड

नवापूर । येथील धृतील दिपक प्रजापत ह्याने बनविलेल्या द व्हर्सटाईल स्मार्ट टॉय कम पॉवर जनरेटर या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावरील सायन्स प्रदर्शनामध्ये निवड झाल्याने धृतील, व त्याचे वडील दिपक प्रजापत आणि मार्गदर्शक शिक्षक डी.पी.पाटील ह्यांचा नवापूर एज्युकेशन सोसायटीद्वारा अध्यक्ष विपिन चोखावाला ह्यांचे हस्ते शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धृतीलच्या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड व्हावी म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. आतापर्यंत त्याच्या उपकरणाची राज्यस्तरावर दोनदा निवड झाली आहे. धृतील ह्यास राष्ट्रीय सायन्सस्पर्धेसाठी शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.