धोत्रे येथे दोन बंधार्‍यातील जलसाठा समाधानकारक

0

भडगाव। तालुक्यातील धोत्रे येथे माजी जि.प. उपाध्यक्ष व समन्वय समिती अध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांच्या प्रयत्नाने वनविभागामार्फत बांधण्यात आलेल्या दोन बंधार्‍यात पाण्याचा चांगला साठा झाला असून भडगाव तालुक्यात चिमुरचे आमदार बांगडीया, भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी तालुक्याची पाहणी केली होती. धोत्रे (अंचळगाव) येथील दोन वन बंधारे डॉ.संजीव पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याने समन्वय समितीच्या माध्यमातून पहिल्याच बैठकीत मंजूर करून हे बंधारे पूर्णत्वास आले आहे. यासाठी डिपीडिसीत ही निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. दोन टेकड्याच्या नाल्यातील खडकाळ जमिनीत हे बंधारे साकारण्यात आल्याने सध्या हे बंधारे तुडुंब भरले असून ओसांडून वाहत आहे. अर्धा किमी अंतरापर्यंत या भागात पाणी साचले आहे. याभागाची नुकतीच पाहाणी करून डॉ.पाटील यांच्या हस्ते ट्रीगार्डसह वृक्षारोपण करण्यात आले.

परीसरात केले वृक्षारोपण: एस.आर.पाटील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधीकारी अशोक पाटील तत्कालीन वनपाल भडगाव, तत्कालीन वनरक्षक आमडदे कविता पाटील, तत्कालीन वनरक्षक सुनिल पाटील, वनमजूर विजय बडगुजर, साहेबराव मोरे यांनी बंधार्‍याच्या कामासाठी परिश्रम घेतले होते. धोत्रे (अंचळगाव) या भागात बरड जमीन होती.