लंडन । भारताने चॅम्पियन स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. भारताने केलीली गोलंदाजी व फिल्डींग यामुळे सामन्यात विजय मिळविला. या विजयानंततर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याचे तोड भरून विराट कोहलीने कौतुक केले.सामन्याच्या कोणत्याही क्षणी धोनीचा सल्ला महत्वाचा असतो. धोनीमुळे मला एक खेळाडू म्हणून स्वतःला घडवण्याची संधी मिळाली होती, अनेकदा धोनीमुळेच मी संघाबाहेर जाण्यापासून वाचलो होतो. कर्णधार म्हणून धोनीची जागा चालवण हे सोप्प नाही असे कोहलीने नमूद केले आहे.