धोनीची कोरोना टेस्ट; रिपोर्ट…

0

नवी दिल्ली: सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे यावेळीची आयपीएल स्पर्धा होणार की नाही? याबाबत शंका होती. मात्र १३ व्या मोसमातील आयपीएल स्पर्धा यूएईत होणार आहे. आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सज्ज झाला आहे. परंतु संघाच्या कॅम्पमध्ये दाखल होण्यापूर्वी धोनीला कोरोना टेस्ट करावी लागली आहे. धोनीने केलेल्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह आहे. त्यामुळे धोनीचा कॅम्पमध्ये दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तो रांची येथील फार्महाऊसवर आहे.

केंद्र सरकारनंही परवानगी दिल्यानंतर सर्व फ्रँचायझींनी आपापल्या खेळाडूंना एका ठिकाणी एकत्रित आणण्याची तयारी सुरू केली आहे. माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सनंही कॅम्प बोलावले आहे. त्यासाठी धोनीनं कोरोना चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे धोनी लवकरच CSKच्या कॅम्पमध्ये दाखल होणार आहे.