धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही – वीरेंद्र सेहवाग

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 2019 मध्ये होणार्‍या आयसीसी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत खेळू शकेल किंवा नाही, हे अजून ठरले नाही. मात्र, भारतीय संघाचा माजी दमदार खेळाडू विरेंद्र सेहवाग म्हणाला की, मला नाही वाटत की, कोणताही खेळाडू सध्या धोनीची जागा घेऊ शकतो. सेहवाग म्हणाला की, ऋषभ पंत चांगला आहे. मात्र, त्याला धोनीची जागा घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे. असे विश्‍वचषक स्पर्धेनंतरच होऊ शकते. धोनीच्या पर्यायाबाबत आपल्याला 2019 च्या विश्‍वचषक स्पर्धेंतरच विचार करायला हवा. तोपर्यंत पंतने अनुभव घ्यायला हवा.

मधल्या फळीचा सशक्त अनुभव पाठीशी…
एका मुलाखतीत सेहवाग म्हणाला की, धोनी हा फिट रहावा, अशी क्रिकेटप्रेमींनी प्रार्थना करायला हवी. धोनी धावा करतोय की, नाही याची चिंता करू नये. आता केवळ एकच प्रार्थना केली पाहिजे की, धोनी 2019 च्या विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत फिट रहायला हवा. मधल्या फळीत फलंदाजी करण्याची जो अनुभव धोनीकडे आहे तो कुणाकडेही नाही, असे सेहवाग म्हणाला. क्रिकेट विश्वात अशीही चर्चा कायला मिळत आहे की, धोनीचा फॉर्म चांगला नसला तर केएल राहुल विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळेल.

100 सामन्यांचा अनुभव हवा
सेहवाग या विचारा विरोधात आहे. तो म्हणाला की, मी कधीही अशा विचाराचं समर्थन करणार नाही. सेहवागला वाटतं की, मधल्या फळीतील फलंदाजांना अधिक संधी दिली गेली पाहिजे. जेणेकरून विश्‍वचषक स्पर्धेच्या आधी प्रत्येक खेळाडूकडे साधारण 100 सामन्यांचा अनुभव असेल. त्यांच्याकडे प्रत्येक परिस्थीतीमध्ये खेळण्याची प्रतिभा असली पाहिजे. अनुभवामुळे कुणीही दबावाला दूर करू शकतो. कठिण काळातही सामन्या जिंकला जाऊ शकतो. जर त्यांना संधी मिळाली नाही तर या गोष्टीमुळे संघ कमजोर होईल.