धोनीची जागा कोहली! शक्यच नाही

0

मुंबई । भारतीय क्रिकेट टिममध्ये धोनीचे महत्त्वपूर्ण असे स्थान आहे आणि ते स्थान निर्माण करण्यासाठी धोनीने मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यासाठीत महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. अनेक कौतुकास्पद कामगिरी बजावल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून धोनीने संन्यासही घेतला. यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा ही युवा कर्णधार विराट कोहलीच्या हातात आली. गेल्या काही महिन्यांमध्ये कोहलीची मैदानातली कामगिरी पाहून अनेक जणांना त्याची तुलना धोनीसोबत करण्याचा मोह झाला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूने कोहलीची तुलना धोनीसोबत होणे शक्यच नसल्याचे म्हणले आहे.

कठीण प्रसंग हाताळणे रोहीतला चांगले जमते
आपल्या काळात झुंझार क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणार्‍या जॉन्टी र्होड्सने विराटची तुलना धोनीसोबत होऊच शकत नसल्याचे म्हणले आहे. महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर हे खेळाडू त्यांच्या ठिकाणी आहेत, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 2008 पासून जॉन्टी हा आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. रोहीतची कर्णधार म्हणून शैली थोडी वेगळी आहे. तो कोहलीइतका मैदानात आक्रमक खेळत नाही, मात्र कठीण प्रसंग हाताळण्याची रोहीतला चांगले जमते, असेही जॉन्टीने म्हणले आहे.