रांची । रांची कसोटी अनेक गोष्टीमुळे लक्षात राहिल त्यामधील मॅथ्यू वेडच्या मिसफिल्डिंग किसा चांगलाच लक्षात राहिल. मॅथ्यू हा रांची सामन्यात भारताच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही फेल गेला.त्यामुळे शेर शेर होता है असे कॉमेन्ट येवू लागले. खरंतर धोनीने कसोटीमधून निवृत्ती स्विकारली आहे. पण धोनीने आपल्या सर्वोत्तम यष्टीरक्षणाने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. धोनीच्या यष्टीरक्षणाच्या अचूकतेचे सर्व चाहते आहेत.
चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान साहा ही जोडी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाटी डोकेदुखी ठरत असताना हा किस्सा घडला. मॅथ्यू वेडनेही वृद्धीमान साहाला धावचित करण्यासाठी आपल्या यष्टीरक्षणातील ‘तल्लख’ता दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू यष्टीच्या नाही, तर भलत्याच ठिकाणी फेकला गेला व भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त धाव वसुल केली.