नवी दिल्ली । देशातील प्रत्येक नागरिकांनी आधार कार्ड देण्याची मोहिम युध्दपातळीवर सुरू आहे. त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी अनेक खेळाडू व मान्यवरांची आधार कार्डचा वापर करण्यात येत आहे.यावेळी भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिग धोनी याच्या आधारचा वापर केला गेला आहे.यावेळी आधार कार्डची संपुर्ण माहिती त्यात वैयक्तीक माहिती सुध्दा जाहिर करण्यात आली. माहीची पत्नी साक्षीने थेट माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना जाब विचारला आहे. चूक लक्षात येताच रविशंकर प्रसाद यांनी साक्षीच्या ट्विटची दखल घेतली. घडलेला प्रकार लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती जाहीर करणे अवैध आहे. यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन रविशंकर प्रसाद यांनी दिले.
नागरिकांना आधार कार्ड देण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.या प्रचारासाठी भारताचा माजी क्रिकेट कप्तान धोनी याच्या आधारचा वापर केला गेला. मात्र यात माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यच्याकडून मोठी चूक झाली असून त्याविरोधात धोनीची पत्नी साक्षी हिने थेट मंत्र्यांना त्याचा जाब विचारला आहे. चूक लक्षात आल्यानंतर मंत्रीमहोदयांनी धोनीची प्रसिद्ध केलेली माहिती त्वरीत हटविली.
वैयक्तीक माहिती सुध्दा जाहिर करण्यात आली
मिळालेल्या माहितीनुसार माहिती प्रसारण विभागाचे अधिकारी मंगळवारी धोनीच्या घरी गेले व त्यांनी आधारसाठी त्याची माहिती घेतली. जनसामान्यात यासंबंधी जागृती व्हावी व त्यांनीही त्यांची आधारकार्ड काढावीत यासाठी या अधिकार्यां नी धोनीच्या आधार कार्डची पूर्ण प्रक्रिया ट्विटरवर दिली त्यात धोनीची वैयक्तीक माहिती असलेला फॉर्मही दाखविला गेला. त्यावर मंत्रीमहोदयांनी अधिकार्यांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले मात्र धोनीची खासगी माहितीही लिक केल्याचे लक्षात येताच साक्षी धोनीने त्वरीत माहिती प्रसार मंत्रालयाशी संपर्क साधून मंत्रीरमहोदयांना त्यांच्या खासगी स्वातंत्र्यावर अतिक्रमण केले गेल्याचे सुनावले. धोनीची वैयक्तीक माहिती लिक कशी करता असे थेट विचारताच मंत्रीमहोदयांना चूक लक्षात आली व त्वरीत ही माहिती हटविली गेली.