धोनीचे टीकाकारांना उत्तर

0

नवी दिल्ली । नेहमी आपल्या तुफान फलंदाजी आणि यष्टीरक्षणासाठी चर्चेत असणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या रिटायर्टमेंटच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे. पण माहीने अशी चर्चा करणार्‍यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. न्यूझीलंड विरुद्धचा दुसर्‍या टी 20 सामन्यातील धोनीच्या खेळानंतर त्याच्यावर निवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. धोनीने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली पाहिजे असे म्हणणार्‍यांमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांचा समावेश होता. धोनीने निवृत्ती घ्यायला हवी असं काही क्रिकेटर्सने म्हटलं तर काहीजण धोनीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

दुसर्‍या खेळाडूंना संधी द्या- अजित आगरकर
भारतीय संघातील माजी गोलंदाज अजित आगरकर याने एका मुलाखतीत म्हटले की, धोनीच्या जागी आता दुसर्‍या खेळाडूला संधी देण्याची वेळ आली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीची भूमिका योग्य आहे मात्र, टी-20 क्रिकेटमध्ये वेगळी आहे. तुम्ही जोपर्यंत संघाचे कर्णधार असता तोपर्यंत सर्व ठिक आहे. धोनीने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली पाहिजे असे म्हणणार्‍यांमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांचा समावेश होता.

प्रत्येकाचा विचार वेगळा
प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो आणि त्यांचे दृष्टीकोनही वेगळे असतात. त्यांच्या (टीकाकारांच्या) विचारांचा आपण सन्मान करायला हवा,अशा शब्दात धोनीने टीकाकारांना उत्तर दिले आहे. खलीज टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत माहिने हे वक्तव्य केले आहे.मात्र, सध्या एक फलंदाज म्हणून आम्ही त्याला मिस करत आहोत. तर धोनी योग्य वेळ आल्यावर निवृत्ती घेईल आणि तरुण खेळाडूंनी संधी देईल अशी भूमिका माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने घेतली आहे.