नवी दिल्ली । हॉटेलला 17 मार्चला आग लागली होती. हॉटेल मध्ये आग लागल्यानंतर धोनीसह सर्व झारखंड खेळाडू हॉटेलमधून बाहेर पडले होते. त्या वेळी आपले तीन मोबाईल फोन चोरीला गेले होते, अशी तक्रार रविवारी धोनीने स्थानिक पोलिसांकडे केली होती.
त्यानंतर पोलिसांना तपास करून मोबाइल मिळाल्याचे जाहीर केले.‘भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे हरवलेले तिन्ही मोबाइल फोन सापडले आहेत,’ अशी माहिती
पोलिसांनी दिली.