धोनीच्या ‘चौकारने’ भारताचा विक्रम

0

पोर्ट ऑप स्पेन । भा रतीय संघ एका पोठोपाठ विक्रम आपल्या नावावर करित आहे. वेस्ट इंडिज याच्या सोबत सुरू असलेल्या एकदिवसीय दुसर्‍या सामन्यात भारताने विजयासह विक्रम आपल्या नावावर केला.अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने दमदार खेळ करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली.राहणे याने शतकी खेळी केली. यानंतर शिखर धवन व विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली.मात्र 300 धावांचा पल्ला जवळ असतांना मैदानावर खेळत असलेल्या महेंद्रसिंग धोनी व केदार जावधने यांनी आपल्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर 300 धावांचा टप्पा ओलांडला. 300 धावा पार करताच भारतीय संघाने एकदिवसीयमध्ये सर्वाधिक वेळा 300 धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावांवर केला. आता पर्यंत 96 वेळा 300 धावां भारताने केल्या आहे.

वन डेमध्ये सर्वाधिक 300 पेक्षा धावा करणारे संघ
भारत – 96ऑस्ट्रेलिया – 95द. आफ्रिका – 77 पाकिस्तान – 69 श्रीलंका – 63 इंग्लंड – 57 न्यूझीलंड – 51

पहिल्यांदा 300 पेक्षा जास्त धावा करणारे संघ
1975 – इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान 1978 – वेस्ट इंडिज1992 – झिम्बाब्वे, श्रीलंका1994 – दक्षिण आफ्रिका1996 – भारत 21 वर्षातील भारताचे रेकॉर्ड

सलामीजोडीची चांगली सुरवात
पावसाचे आगमन झाल्यामुळे भारत वेस्टइंडिजचा सामना 43 षटकांचा झाला. सालमी जोडी अजिक्य राहणे व शिखर धवन याच्या जोडीने भारताला चांगली सुरवात करून दिली. अजिंक्य, शिखर आणि कर्णधार कोहली बाद झाल्यानंतर पांड्याला बढती देण्यात आली. मात्र तो 4 धावा करून बाद झाला. युवराज 14 धावा करून तंबूत परत गेला. 42 षटकांचा सामना झाला त्यावेळी भारतीय संघाची अवस्था ही 5 बाद 288 अशी होती. सामन्याचे अखेरचे षटक होते.मैदानावर महेद्रसिंग धोनी व केदार जाधव खेळत होते. भारतीय संघाला 300 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 12 धावांची गरज होती.अखेरच्या षटकातील पाचवा चेडू होल्डरने नो बॉल टाकला याच चेडूवर धोनीने चौकार मारून भारताच्या विक्रमावर शिक्का मोर्तब केला.या षटकात 22 धावा काढल्या. भारताने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा तीनशेपेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियन संघाचा विक्रम मागे टाकत भारताने हा करिश्मा केला आहे. यापूर्वी सर्वाधिक वेळा 300 पेक्षा अधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियन संघाने 95 वेळा 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 300 धावा करत 96 वेळा तीनशे धावा उभारण्याचा विश्वविक्रम रचला.

21 वर्षात 96 वेळा तीनशे प्लस धावा
भारताने पहिल्यांदा 15 मार्च 1996 रोजी शारजाह इथे 300 ही धावसंख्या गाठली होती. ऑस्ट्रेलियाशी तुलना करायचे झाल्यास, त्यांनी हा आकडा 1975 मध्येच गाठला होता.1996 नंतर आतापर्यंत 21 वर्षात भारताने 96 वेळा 300+ धावसंख्या केली. तर इतक्या वर्षात ऑस्ट्रेलियाने 88 वेळा अशी कामगिरी केली. भारताने परदेशात 53 वेळा, तर भारतात 43 वेळा 300+ धावा केल्या आहेत. 1996 नंतर कोणाच्या किती 300+ धावा? भारत – 96ऑस्ट्रेलिया -88द. आफ्रिका – 72पाकिस्तान-62 श्रीलंका -59इंग्लंड – 50न्यूझीलंड -46वेस्ट इंडिज – 29