धोनीने मोडला अजहरचा विक्रम

0

कोलंबो । श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताचा शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नाबाद 124 धावा आणि धोनीच्या नाबाद 67 धावामुळे भारताचा विजय सोपा झाला. एकदिवसीय क्रिकेटमधले रोहित शर्माचे हे 12 वे शतक होते.

रोहितच्या या शतकी खेळीत 16 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सामन्यातील 67 धावांच्या या खेळीमुळे धोनीने मोहम्मद अजहरुद्दीनचा विक्रम मोडला आहे. सर्वात जास्त धावा बनवणार्‍या भारतीय खेळाडूंच्या यादीत धोनी चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. धोनीने 299एकदिवसीय सामन्यांध्ये 51.55च्या सरासरीने 9,434 धावा बनवल्या आहेत. अजहरने 9,378 धावा बनवल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणार्‍या भारतीयांच्या यादीमध्ये सचिन तेंडुलकर(18,426) राहुल द्रविड (11,221) आणि सौरव गांगुली(10,768) आहेत. या विक्रमाबरोबरच धोनी एका संघाविरोधात सर्वात जास्त अर्धशतके बनवणारा विकेट कीपर बनला आहे. धोनीनं श्रीलंकेविरोधात 18 व्यांदा अर्धशतक झळकवलं. याआधी संगकारानंही भारताविरोधात 18 अर्धशतकं झळकावली होती.