नवी दिल्ली । भारतीय संघातील स्टारफलंदाज सुरेश रैना सध्या संघाधून बाहेर आहे. मात्र, सुरेश रैनाने कर्णधार विराट कोहलीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे. सुरेश रैनाच्या मते, विराट कोहली हा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्याप्रमाणेच संघाचे नेतृत्व करत आहे. विराट कोहली हा धोनीप्रमाणेच यश प्राप्त करु शकतो. विराट कोहली हा सुद्धा धोनीप्रमाणे लवकर पराभव मान्य करत नाही, असेही रैनाने म्हटलं आहे.
सुरेश रैना सध्या चेन्नईमध्ये कलपती-एजीएस- बूची बाबु स्पर्धो खेळत आहे. येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सराव करत असताना रैनाने म्हटले की, या मैदानासोबत भारतीय संघाच्या आठवणी जोडल्या आहेत. सुरेश रैनाने भारतीय संघ आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी या मैदानात अनेक सामने खेळला आहे. भारतीय संघाातून बाहेर असलेला रैना आपला फिटनेस मजबूत बनविण्यासाठी मेहनत घेत आहे. मात्र, रैना नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये यो-यो फटनेस टेस्ट फेल झाला आहे.