मुंबई । भारताने चॅम्पियन ट्रॉफीत पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले.मात्र अतिम सामन्यात पाकिस्ताने भारतीय संघाला चांगलीच धुळ चारली. याचबरोबर अनिल कुंबळे व विराट कोहली याच्यातील वाद समोर आला.त्याचबरोबर सिनीअर खेळाडूंच्या जागेबद्दल प्रश्न उपस्थित झाले.राहूल द्रविड यांनी युवराज सिंह व महेद्रसिंगला पर्याय तयार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.आगामी विश्व चषकात या खेळाडूंची भुमिका काय असेल यावर राहुल द्रविडने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.त्याचबरोबर सध्याला युवराजसिंगची बॅट चालत नसल्याने त्याजागी भारतीय संघात स्थान घेण्यासाठी पाच फलंदाजीची नावे समोर आली आहे.तर धोनीची जागा घेण्यासाठी दोन नावे समोर येत आहे.ते दोघे युवराजसाठी ही पर्याय आहे.
भारतामधील राष्ट्रीय स्पर्धा आणि आयपीएलमधली कामगिरी लक्षात घेऊन हे 5 तरुण खेळाडू पुढील काळात युवराज सिंहची जागा भरुन काढू शकतात.यात मनीष पांडे याची चॅम्पियन ट्रॉफीसाठी निवड झाली होती.मात्र दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती.
सुरेश रैना हा 12 वर्ष रैना संघाचा अविभाज्य भाग होता. फॉर्म गमविल्याने स्थान गमविले. फलंदाजी त्याला परत संघात युवराजच्या जागी आणू शकते.वन-डे, कसोटी आणि टी-20 या तिन्ही प्रकारात अनुभव आहे. त्याचप्रमाणे युवराजप्रमाणे तो गोलंदाजीत बळीही मिळवून देतो. .
मुंबईचा रणजी पटू श्रेयस अय्यरने गुणवत्ता दाखविली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात असताना कोहलीला दुखापत झाल्यानंतर श्रेयसला भारतीय संघात बॅकअप प्लान म्हणून बोलविले होते. वयाने लहान असून संधी मिळाल्यास 2019 च्या विश्वचषकाचा खेळाडू बनू शकतो.
युवराजपेक्षा संजू सॅमसन हा धोनीची जागा घेण्यात एक चांगला पर्याय ठरु शकतो. धडाकेबाज खेळीने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. एका टी-20 सामन्याचाही अनुभव आहे.फलंदाजीची शैली, शॉट सिलेक्शन आणि तरुण वय हे 3 मुद्दे संजू धोनीची जागा घेण्यासाठी पुरेसे आहेत.
ऋषभ पंत हा युवराजची जागेसाठी योग्य पर्याय आहे. आक्रमक फटकेबाजी युवराजच्या जागेसाठी पुरेश आहे.तो यष्टीरक्षक असल्याने धोनीची जागा घेवू शकतो.सध्या वेस्ट इंडिज दौर्यात ऋषभची संघात निवड झाली आहे. आगामी विश्वचषकाआधी पंतची संघात जागा पक्की मानली जातेय.
चमकदार कामगिरी नाही
भारतीय संघामध्ये महेंद्रसिंग धोनी हे एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जाते. याचबरोबर तो एक लढाऊ वृत्तीचा खेळाडू तसेच शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी झगडणारा खेळाडू म्हणून त्याने आपला नावलौकिक केला आहे. मात्र, कसोटी व कर्णधार पदावरून निवृत्त झाल्यानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतांना धोनी पूर्वीसारखी चमक दाखविण्यात काही प्रमाणात अपयशी ठरला आहे. तो एक चांगला यष्टीरक्षकही आहे. तो मैदानात असला तर समोरच्या संघाला एक भीती असते, त्याचबरोबर युवराजसिंगने कर्करोगातून बाहेर पडून भारतीय संघात स्थान मिळवून पुन्हा आगमन केले असले तरी तो पुर्वीचा धडाकेबाज फलंदाज म्हणून व षटकारांचा शहंशहा म्हणून ज्याची ओळख आहे ती पुन्हा निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे.