लंडन । भारताचे स्टार फलंदाज जे मैदानावर खेळण्यासाठी आल्यावर समोरील संघातील गोलंदाजी त्रेथात्रिपट उडून जायची.त्या भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, रोहित शर्मा यांना सुध्दा काही गोलंदाजी फलंदाजी करतांना भिती वाटत असो. महेंद्रसिंग धोनी यशस्वी कर्णधार , एकदिवसीय सामन्यामध्ये 2 वेळा व्दिशतक बनविलेला रोहित शर्मा व विस्फोटक फलंदाजी संधी मिळाल्यास चेडूला सीमापार दिशा दाखविणारा युवराजसिंग यांनी विराट कोहलीच्या चॅरिटी डिनर कार्यक्रमात या गोेष्टीवर चर्चा केली.
धोनीला शोएबच्या गतीमुळे भिती वाटायची – जगातील सर्वाश्रेष्ठ असा खेळाचा शेवट सुंदर पध्दतीने करणारा धोनीला माणले जाते. त्यालाही रावलपिंडी एक्सप्रेस म्हणजे शोएब अख्तर या गोलंदाजाची भिती वाटते असे. तो म्हणाला की, अख्तर फार वेगवान गोलंदाज होता. त्याच्याजवळ चेंडू टाकण्याच्या अनेक विविधता होती. तो यॉर्कर सुध्दा टाकू शकत होता. शोएब गोलंदाजीवर समजून घेणे सोपे नाही. त्याच्यासमोर फलंदाजी करतांना समस्या येत,त्याच्या वेगवान चेंडूचा सामना करणे सोपे नव्हते.
डेन स्टेन हा समस्या निर्माण करायचा रोहित शर्माला – एक दिवसीय सामन्यात 2 वेळा व्दिशतक केलेला रोहित शर्माला दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाजाला घाबरायचा .रोहित म्हणाला की, आपल्या क्रिकेटच्या करियर मध्ये त्याला विशेषकरून डेल स्टेन या गोलंदाजाने हौराण केले आहे.तो वेगवान चेडू टाकतो त्यामुळे त्याच्या समोर खेळतांना नेहमी एक आव्हान असतो.
ग्लेश मैक्ग्रामुळे युवीला व्हायचा त्रास – जगात आपल्या जोरदार फलंदाजी व षटकार मारण्याच्या कलेमुळे प्रसिध्द असलेला युवराजसिंग म्हणाला की, क्रिकेटच्या करियरच्या सुरवातील ऑस्ट्रेलियाचा वेगवना गोलंदाज ग्लेन मैक्ग्रा याच्या समोर खेळतांना समस्या आली होती.मैक्ग्रा सटीक लाईन लेथ नुसार गोलंदाजी करतो त्यामुळे फलंदाजाला धावा काढण्या सोप्या नाही.तो फलंदाजाना धावा काढण्याची कोणतीच संधी देत नाही.