धोनीवर किमान १-२ सामन्याची बंदी घालायला हवी होती: विरेंद्र सेहवाग

0

नवी दिल्ली: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने पंचाशी वाद घातल्याचा प्रकार घडला. त्यामुळे धोनीला शिक्षा देखील झाली आहे. धोनीच्या मानधनात ५० टक्के कपात झाली आहे. दरम्यान धोनीच्या त्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने देखील धोनीच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. धोनीने चुकीचा पायंडा पडला आहे. त्याला शिक्षा म्हणून किमान १-२ सामन्यावर बंदी घातली पाहिजे होती, असे विरेंद्र सेहवागने सांगतिले आहे. धोनीला दंड म्हणून एका सामन्यातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली आहे. धोनीला झालेली ही शिक्षा कमी असून किमान १-२ सामन्यावर बंदी घातली पाहिजे होती असे सेहवागने सांगितले.

https://www.cricbuzz.com/cricket-videos/35939/dhoni-let-off-easy-should-have-been-banned-for-at-least-1-2-games-sehwag

https://janshakti.online/new/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2/


माणसाकडून चुकी होत असते, त्याप्रमाणे पंच देखील एक माणूसच असून त्यांच्याकडून चुक होणारच. परंतु धोनीने मैदानात येऊन पंचाशी वाद घालणे चुकीचे होते, असे प्रकार वारंवार घडू नये यासाठी धोनीला शिक्षा व्हायला हवी होती असे सेहवागने म्हटले आहे. राजस्थानविरुद्ध चेन्नईच्या सामन्यात पंचाने नो-बॉल नसतांना नो-बॉल दिल्याने धोनी पंचावर भडकले. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.