इंग्लंड । मेरिलबेन क्रिकेट (एमसीसी) ने क्रिकेटमधील काही नियम बदविले आहे.सामन्यावेळी यष्टीरक्षकांना गंभीर दुखापत होवू नये म्हणून एमसीसी ने टीथर युक्त बेल वापरण्यास मंजुरी दिली आहे. या बेल यष्टी उखडल्यानंतर जास्त दुर उडणार नाही. मार्क बाउचर ला 2012 वर्षात दक्षिण अफ्रिकाच्या इंग्लंड दौर्यावेळी सुरवातीच्या सामन्यात या बेलमुळे डाव्या डोळ्यास गंभीर जखम झाली होती. त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली होती.शस्त्रक्रियेनंतर त्याला क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली होती.भारताचा माजी यष्टीरक्षक सबा करीमला या दुखापतीमुळे क्रिकेटमधील कारर्किद संपली होती.
2000 साली ढाका येथे बांगलादेशाच्या खिलाफ एशिया चषकातील सामन्यात अशी दुखापत झाली होती. अनिल कुंबळेच्या चेडूवर बेल उडून फलंदाजाच्या बुटाला लागुन साबा करीम यांच्या उजव्या डोळ्याला लागली होती.भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी याच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती.मागील वर्षी झिम्बाबे विरूध्द शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळतांना बेल लागली होती. या घटना बघता एमसीसी ने नियम 8.3 बदविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्याकरिता दक्षिण अफ्रिका व इंग्लंडच्या दोन कंपनीला डिजाइन बनविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
टीथर युक्त बेल असणार आहे.बेल पडल्याच्या गतीमध्ये कोणताच बदल होणार नाही. एमसीसी निमवालीचे व्यवस्थापक असलेले फ्रेजर स्टेवार्ट म्हणाले की, कोणत्या खेळाडूच्या डोळ्यांची दृष्टी जाण्यापासून वाचत असले तर त्यावर विचार करणे गरजेचे आहे. पुढे ते म्हणाले की, यावर कंपनी अजुनही काम करित आहे.मात्र एमसीसीने नियमात याप्रकारचे उपकरण वापरण्यास परवानगी दिली आहे.यानंतर हे वापरायचे की नाही हे संस्था चालविणार्यावर अवलंबून आहे. नियम 8.3.4 नुसार खेळाडूच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंत्र वापरण्याची परवानगी दिली आहे.