धोनी आणि गंभीर लढविणार भाजपकडून निवडणूक?

0

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर राजकरणात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. सामाजिक क्षेत्रात ते सध्या काम करीत आहे. त्यामुळेच ते आगामी काळात होऊ घातलेल्या २०१९ ची निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान माही महेंद्रसिंग धोनी देखील २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.

एका अहवालातून ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना तिकीट मिळू शकते असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.