धोनी गेल्यामुळेच युवराजचे झाले कमबॅक

0

चंदीगड : आपण दोन वर्षांपूर्वीच सांगितले होते की धोनी जाताच युवीचे संघात कमबॅक होईल, असे म्हणत पुन्हा एकदा युवराज सिंहचे वडील योगीराज सिंह यांनी महेंद्रसिंह धोनीला धोनीला लक्ष्य केले आहे. टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहच्या तीन वर्षानंतर संघात कमबॅक झाल्यानतंर त्याचे वडिल योगराज सिंह खुश आहेत. याअगोदरही धोनीमुळेच युवीला संघात स्थान मिळत नसल्याचे सांगत त्यांनी धोनीवर टीका केली होती.

इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी युवराजची टीम इंडियात निवड झाली आहे. युवराज सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला आता त्याच्या फलंदाजीने उत्तर द्यावं लागेल, असेही योगराज सिंह म्हणाले. युवराजने 2013 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन डे खेळला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 टी ट्वेंटी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र रणजीतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा टीम इंडियात आपली जागा निश्चित केली आहे. महेंद्र सिंह धोनीने वन डे मालिकेसाठी संघ निवडीअगोदरच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता कसोटी कर्णधार विराट कोहलीकडे वन डे आणि टी ट्वेंटीच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.

आपल्या बंगळूर संघात युवराजला सर्वाधिक बोली लावून घेण्याचा हट्ट धरणारा विराट कोहली एकदिवसीय संघाचा कर्णधार होताच युवराजचे पुनरागमन झाले आहे. “युवी’ तीन वर्षांनंतर वन डे, तर वर्षानंतर टी-20 संघात परतला आहे. दुसरीकडे धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर सुरेश रैनाने वन-डे संघातील स्थान गमावले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरून दूर केल्यानंतर आणि धोनीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर झालेल्या निवड समितीच्या बैठकीत पहिल्या कर्णधारची छाप असल्याचे दिसून आले. न्यूझीलंडविरुद्ध धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघात फार बदल झाले नाहीत.