स्वारगेट । शंकरशेठ रोडवरील श्री संत गाडगेबाबा महाराज चौकातील धोबीघाट मित्र मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने तयार केलेल्या काल्पनिक महलचे उद्घाटन लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक काझी, पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीचे सदस्य प्रविण गाडे, प्रविण जाधव, धोबीघाट मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश तोटेल्लू, उपाध्यक्ष सुमित बेलिटकर, कार्याध्यक्ष विवेक आरमुर, खजिनदार प्रशांत आरमुर, उपखजिनदार अभिजीत बेलिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.