जळगाव प्रतिनिधी । जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व जिल्हा धोबी समाज शिक्षक बहुउद्देशीय मंडळातर्फे रविवारी धोबी समाजातील विविध गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेविका सुरेखा सोनवणे, नरेंद्र जाधव, एकनाथ बोरसे, दिलीप शेवाळे, विठ्ठल सोनवणे, विवेक ठाकरे, अरुण राऊत, बारा बलुतेदार महासंघ अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, सागर सपके, भास्कर महाले, जगन्नाथ बाविस्कर, दीपक शिरसाळे उपस्थित होते. या कार्यक्रमात पीएसआय मनोहर जाधव, पोलिस महासंचालक माणिक सपकाळे, संजय पवार, कुणाल जाधव, खेळाडू उमाकांत जाधव, अनिकेत वाघ, मिताली शेवाळे, निखिल ठाकरे, वर्षा सपकाळे, कोमल कापसे, डिंपल बोरसे, वैष्णवी सपके, हिमांशू चांदसेकर, सुरेखा सोनवणे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी केले. करुणा महाले, गणेश बच्छाव, पंकज महाले, देविदास वाल्हे यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली वाल्हे यांनी आभार मानले. तर उमेश्वर सूर्यवंशी, सतीश वाघ, रमेश ससाणे, चंद्रकांत वाघ, गणेश सपके, प्रशांत मांडोळे, किशोर बोरसे, विजय शेवाळे, अर्चना शेवाळे, विनोद शिरसाळे, किशोर शिरसाळे यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.