ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त मगर महाविद्यालयात क्रीडादिन

0

हडपसर । पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आजीव सदस्य सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकी संघाला ऑलिंपिकमध्ये सलग तीन वेळा सुवर्णपदक मिळवून दिले. ड्रीब्लिंग या कौशल्यामध्ये चेंडू आणि हॉकी स्टिकचा चपळाईने वापर त्यांनी केला. त्यांच्या प्रमाणे महाविद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राकडे करियर या दृष्टीने पाहून स्वत:चे, महाविद्यालयाचे, कुटुंबाचे पर्यायाने देशाचे नाव उज्वल करावे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले, पंचायत समितीचे उपसभापती अजिंक्य घुले, रुपाली चाकणकर, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप, प्रा. रमा गांगुर्डे, प्रा. प्रीतम ओवाळ, प्रा. संजीव पवार, डॉ. प्रवीण ससाणे, एम.एन. कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, सूत्रसंचालन प्रा. संजीव पवार तर आभार प्रा. प्रीतम ओवाळ यांनी मानले.