ध्येयप्राप्तीसाठी उगवते सूर्य व्हा : पोलिस निरीक्षक विलास शेंडे

Be the rising sun to achieve your goals: Police Inspector Vilas Shende  भुसावळ : विद्यार्थ्यानी आपल्या मिळालेल्या यशाचे पुढे आयुष्यात चीज करण्यासाठी उगवते सूर्य व्हावे, असे आवाहन भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी केले. कुर्‍हेपानाचे येथील आदर्श हायटेक आय.टी.आय.मध्ये झालेल्या दीक्षांत समारंभ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी अ‍ॅड.वसंतराव झारखंडे, गजेंद्र महाजन, शिवाजी पाटील, कैलास महाजन, प्राजक्त पाटील उपस्थित होते.

यंदापासून दीक्षांत सोहळ्याचे आयोजन
दर्जेदार व कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयटीआयद्वारे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. देशाच्या विकासात युवकांचा मोठा वाटा असतानाही त्यांना पदवी बहाल करताना कुठलाही सोहळा होत नसल्यानेच यंदापासून या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने विश्वकर्मादिनी 17 सप्टेंबरला देशभरात आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाकडून प्रथमच घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने आदर्श हायटेक आय.टी.आय.येथे दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यात संस्थेतील अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

यांनी मिळवले यश
संस्थेतून वीजतंत्री या विभागातून प्रथम रोहित खैरणार, द्वितीय- देवेंद्र घुघरे, तृतीय-समाधान गवळी तर वेल्डर या विभागातून प्रथम- नंदिनी वाघ, द्वितीय- उर्वेश मुळी, तृतीय- रोहिणी पाटील तर फिटर या विभागातून प्रथम- अजय तायडे, द्वितीय- कुणाल पाटील, तृतीय- प्रथमेश झारखंडे यांना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन जितेंद्र नेमाडे यांनी केले. घनश्याम महाजन, श्रीकांत कुलकर्णी, सचिन नागपुरे, विनोद राणे, हेमलता पाटील, भगवान हिवाळे, शाम वराडे यांनी सहकार्य केले. शुभम बनसोडे यांनी आभार मानले. मार्गदर्शन प्राचार्य एस.के.कुरेशी यांनी केले.