भुसावळ प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दिव्यांग महिलांचा मेळावा ; महिलांना साड्यांचे वाटप
भुसावळ- ध्येयाची निश्चिती केल्यास निश्चितच यश मिळू शकते, मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता कार्य करीत रहा, शासनाच्या विविधांगी योजना असून त्यांचा लाभ घ्यावा, काही मदत लागल्यास प्रतिष्ठा महिला मंडळ निश्चित सहकार्य करेल, अशी ग्वाही प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी येथे दिली. आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील दिव्यांग महिलांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, पंचायत समिती सदस्य मनीषा पाटील, शिक्षण विसार अधिकारी रागिणी चव्हाण, कनिष्ठ प्रशासन अधिकारी कल्पना रावळ आदींची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी अनिता आंबेकर, सारीका यादव, मनिषा काकडे, अर्चना सोनवणे, किरण चोपडे, देविदास चौधरी, रवींद्र पाटील, नारायण कोळी आदींनी परीश्रम घेतले. दरम्यान, दिव्यांग महिलांसाठी समाज कल्याण विभागांतर्गत पंचायतराज संस्था त्यांच्या स्व-उत्पन्नातून पाच टक्के निधीतून अपंग कल्याणकारी योजना राबवू शकतात तसेच महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई यांच्याकडील योजना तसेच घरकुल योजनेबाबत कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र फेगडे यांनी दिली तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांनी माहिती दिली. बचत गटांया विविध योजनांबाबत सोनार माहिती दिली.