ध्येयासाठी वेळेचा सदुपयोग करा

0

भुसावळ । आज संपूर्ण जगामध्ये स्पर्धेचे युग निर्माण झाले आहे आणि त्यात टिकून राहण्यासाठी सर्व अभियत्यांना अखंड ज्ञान प्राप्त करने ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. ध्येय निश्चित करा व ध्येय प्राप्त करण्यासाठी वेळेचा पूर्ण उपयोग करा. मोठ्या मोठ्या कंपनी अजुनही कुशल मनुष्य बळासाठी भटकंती करीत आहेत तयार व्हा. आज भारताने 104 उपग्रह एकाच वेळेस सोडले तुमच्या कौशल्याने काही काळात आपण 1 हजार उपग्रह सोडणार याची खात्री असल्याचे प्रतिपादन भुसावळ आयुध निर्माणीचे जनरल मॅनेजर आर.एस. ठाकुर यांनी केले. इंडियन स्टूडेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन चॅप्टर अंतर्गत संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक स्पर्धा टेक्सलंस- 2017 चे आयोजन करण्यात आलेले होते. पोस्टर प्रेजेंटेशन, पेपर प्रेजेंटेशन व प्रोजेक्ट प्रेजेंटेशन अशा तिन प्रकारामध्ये नाशिक, अमरावती, पुणे, जळगाव, मुंबई येथील 257 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

स्पर्धेत यांना मिळाले यश
माऊली महाविद्यालय शेगांवच्या सुहास जायभाये, मोहन मिटकरी, राहुल ठाकुर, शेख शोएब यांनी मल्टी टालेंटेड स्पाय रोबोट प्रोजेक्ट सादर केला. यांना प्रथम बक्षिस मिळाले. शुभम जोशी याने बी.टी.1.0 हा सिस्टम सादर केली. यांना द्वितीय बक्षिस मिळाले. गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या प्रतीक्षा पाटील, पायल वाघुळदे यांनी गूगल प्रोजेक्ट लूण हा शोध निबंध सादर केला. याला प्रथम तर गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या पवन महाजन, कांचन धांडे यांनी सर्जिकल रोबोटिक्स या विषयवार अप्रतिम शोध निबंध सादर केला त्यांना द्वितीय बक्षिस मिळाले.

सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा संशोधन स्पर्धा महत्वाच्या
प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे आयुध निर्माणी जनरल मॅनेजर आर.एस. ठाकुर, प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह, आयएसटीई प्रमुख प्रा.एस.बी. ओझा, डॉ. राहुल बारजिभे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी तंत्रज्ञानाची गरज आज प्रत्येक क्षेत्रात आहे, डिजिटल क्रांतीमुळे घरा घरामध्ये तांत्रिक कौशल्य वापरले जात आहे. टेक्सलंस सारख्या स्पर्धा वैज्ञानीक संकल्पना कृतीमध्ये उतरवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात तसे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा संशोधन स्पर्धा महत्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सिंह यांनी केले.

पोस्टर प्रेजेंटेशन
डिजिटल इंडियावर आधारित पोस्टर प्रेजेंटेशनमध्ये ई-गव्हर्नन्स व ई-कॉमर्सची व्याप्ती दाखवून ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून घरबसल्या वस्तू विकत घेता येते. तिच्या दर्जाबद्दल शंका असल्यास ती वस्तू परत देता येते यावर सादरीकरण केले. शासकीय तंत्रनिकेतन नंदुरबार येथील चंचल पाटील, फाल्गुन वानखेडे यांना प्रथम बक्षिस मिळाले. गाडगेबाबा अभियांत्रिकीचे मानसी ठाकुर, अवेंजल रॉड्रिक्स यांना द्वितीय बक्षिस मिळाले. प्रा. धिरज अग्रवाल, प्रा. सुलभा शिंदे, प्रा. सुब्रमण्यम, प्रा. अग्रवाल, प्रा. धिरज पाटील, प्रा. हरिमकर यांनी परिश्रम घेतले.