ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर होणार कारवाई!

0

जळगाव। महाराष्ट्र शासनाने सणानिमित्ताने होणार्‍या आतिषबाजीमुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी ठोस पावले उचलली असून ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस नियंत्रणास दिले आहेत. त्यामुळे ध्वनीप्रदुषाणामुळे त्रास होत असल्याने आता नागरिकांना पोलिस ठाण्यात तक्रारी करता येणार आहे. त्याबाबत जळगाव पोलिस प्रशासनातर्फे हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक तसेच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक व ई-मेल आयडी पोलिसांनी उपलब्ध करून दिले आहे.

ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसीबल तर रात्री 70 डेसीबल एवढी ध्वनीमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसीबल तर रात्री 55 डेसीबल एव्हढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसीबल तर रात्री 45 डेसीबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसीबल ते रात्री 40 डेसीबलपर्यंत ध्वनीमर्यादा आहे.ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्‍हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे परिपत्रकात म्हटलंय. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत असले त्या भागातील नागरिकांनी जळगाव हेल्पलाईन क्रं. 1091, 0257-2223333 तसेच 0257-2235232 या क्रमांकावर नागरिकांनी पोलीसांत तक्रार करावी. एवढेच नव्हे तर 9422210702 या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावरही तक्रार करू शकतात. त्यामुुळे ध्वनीप्रदुषण पिडीत नागरिकांना तक्रारी करण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.