नंदकुमार पवार, शहाजी गिरे यांना पुरस्कार प्रदान

0

यवत । अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात नंदकुमार पवार यांना सामाजिक कार्य गौरव व शहाजी गिरे यांना आदर्श शिक्षक 2017 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सोमवारी महात्मा फुले यांच्या जन्मगावी म्हणजेच पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. या संमेलनात पवार व गिरे यांना गौरविण्यात आले. नंदकुमार पवार हे गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य पुणेचे अध्यक्ष असून समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ते सामाजिक कार्य करीत आहेत. जिल्हाधिकारी नवनाथ गव्हाणे यांच्या विचारसरणीला प्रेरित होऊन जी.एस.एम राज्य अध्यक्ष प्रभाकर तपासे आणि उपाध्यक्ष सुभाष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार हे कार्य करीत आहेत. कुटुंबाची गरीब परिस्थिती असतानाही त्यांनी एम.बी.एचे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या शिरूर येथील अ‍ॅक्सिस बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत.

सामाजिक कार्याची दखल
पट नोंदणी, गुणवत्ता वाढ, बुद्धीमत्ता परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी व सामाजिक उपक्रम राबवणे, असे कार्य शहाजी गिरे 18 वर्षाच्या सेवा काळात अविरतपणे करीत आहेत. दशरथ यादव, शरद गोरे, चंदूशेठ गिरमे, रमेश जगताप, राजकुमार काळभोर, राजाभाऊ जगताप, सुनील लोणकर आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारताना पुरस्कारमूर्ती सोबत भाऊसाहेब चौगुले, भाऊसाहेब गिरे, रणजीत पाडळे, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.