जळगाव। जिल्हा बँकेत 73 लाख रुपये चलनातील बंद नोटा बदलुन दिल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर सीबीआय पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. सुरुवातीला जिल्हा बँपर्यत मर्यादीत असलेले या प्रकरणाचे धागेदोरे थेट जिल्हा परिषदेपर्यत पाहोचले. जिल्ह्यात दुसर्यांदा दाखल झालेल्या सीबीआय पथकाने जिल्हा परिषदेतील चार जणांची चौकशी केली.
यात सामान्य प्रशासन विभाग उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, सामान्य प्रशासन कक्षाधिकारी सुनिल सुर्यवंशी, बांधकाम स्थापत्य अभियंता नंदु पवार, भुषण तायडे या चार जणांचा यात समावेश होता. नंदकुमार वाणी हे मुलाच्या लग्नानिमित्त 1 मार्च पासून रजेवर होते. गेल्या महिन्याभरानंतर ते सोमवारी 3 रोजी जिल्हा परिषदेत कामावर हजर झाले. वाणी याच्या मुलाचे 5 मार्च रोजी लग्न होते त्यांनी 10 मार्च पर्यत रजा घेतली होती. ते रजेवर असतांनाच सीबीआय पथकाने जिल्हा परिषदेतील सुर्यवंशी, पवार, तयाडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तीघांची मुंबई येथे चौकशी करण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेतुन बदली करण्यात आली. सीबीआयने जिल्हा परिषदेत नोटाबदलीप्रकरणी चौकशी केल्याने वाणींवरील संशय बळावल्याने त्यांनी पुन्हा रजा वाढविल्याचे सांगितले जाते. दुसर्यांदा 24 मार्च रोजी सीबीआय पथक जिल्हा परिषदेत दुसर्यांदा आणि जिल्ह्यात तिसर्यांदा आलेे तेव्हा त्यांनी वाणी यांना ताब्यात घेतले होते. वाणी यांच्या सोबत सुभाष चौकअर्बन बँकेचे व्यवस्थापक अनिल नारखेडे, व्यवस्थापक भरत शहा यांची देखील चौकशी करण्यात आली.