नंदगाव हाणामारी प्रकरणी आरोपींचा जामीन फेटाळला

0

जळगाव । तालुक्यातील नंदगाव फेसर्डी गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर 1 मार्च रोजी दोन गटात राजकीय वैमनस्यातून हाणामारीत आजी-माजी संचालकांसह 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील पाच आरोपींचा जामीन अर्ज न्यायाधिशांनी फेटाळला. तालुक्यातील नंदगाव फेसर्डी गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर 1 मार्च रोजी दोन गटात राजकीय वैमनस्यातून हाणामारी झाली होती. या हाणामारीत कुर्‍हाडी, शिंगाडे घेवून दोन्ही गटात हाणामारी झाली होती. यात आठ जण जमखी झाले होते. या प्रकरणी शांताराम चंद्रा सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात परस्पर विरोधात यावेळी आजी-माजी संचालकांसह 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी रामनाथ पंडीत पाटील, पिंटू पुंजाराम पाटील, सर्जेराव मुळा पाटील, विरेंद्र पांडूरंग पाटील, कुलदिप श्रीराम पाटील यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायधिश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यांनी सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. रमाकांत सोनवणे तर आरोपींतर्फे अ‍ॅड.पी.के.देशमुख यांनी कामकाज पाहिले.