नंदुरबार । फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनच्यावतीने 2 री ज्युनिअर मुले/मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2017-18 चे आयोजन नंदुरबार शहरात 15 ते 17 सप्टेंबर 2017 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले असून सदर स्पर्धेच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदी राम चंद्रकांत रघुवंशी यांची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या आयोजना संदर्भातील बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ते, संघटक आदी उपस्थित होेते. यावेळी सर्वानुमते आयोजन समितीच्या अध्यक्षपदी राम चंद्रकांत रघुवंशी यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, उपाध्यक्ष मयुर ठाकरे, सचिव जितेंद्र माळी तथा सदस्य म्हणून शैलेंद्र रघुवंशी, जगदिश वंजारी, जितेंद्र पगारे, पंकज पाठक, राजेश्वर चौधरी, निलेश गावित, राकेश माळी, आकाश बोढरे, भरत चौधरी, अनिल रौंदळ, महेंद्र काटे, वसिम शेख, विजय जगताप, नरेश राठोड, आनंदा मराठे, मिनल वळवी, सॅबस्टीन जयकर, सुनिल पाटील, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, तुषार सोनवणे, प्रविण परदेशी, प्रा.दिनेश सुर्यवंशी, आनंदा पाटील, संजय मराठे, श्रीराम मोडक, चंद्रकांत परदेशी, प्रा.मनोज परदेशी, करण चव्हाण, निलेश गावीत, महेश भट, विजय जगताप, नरेश राठोड, जयेश राजपूत, दिनेश कुंभार आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
400 खेळाडूंचा सहभाग
या राज्य स्पर्धेत राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील मुले/मुली खेळाडू 15 सप्टेंबर रोजी नंदुरबारात दाखल होणार आहेत. स्पर्धेत 400 खेळाडू संघव्यवस्थापक, प्रशिक्षक, राज्य संघटनेचे पदाधिकारी नंदुरबार शहरात येणार असून दिवसरात्र स्पर्धा होतील. अशाप्रकारे व्यवस्था आयोजन समितीच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे करण्यात आली आहे. स्पर्धो इनडोअर असल्याने क्रीडा संकुलातच सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेत येणार्या खेळाडूंचे भोजन, निवास, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आदी परिपूर्ण व्यवस्था जिल्हा संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, संघटक यांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष राम रघुवंशी यांनी केले आहे.