नंदिनीबाई विद्यालयात गुणवंत विद्यार्थींनींचा सत्कार

0

जळगाव । लेवा ऐज्युकेशनल युनियन संचलीत नंदिनीबाई वामनराव मुलींंचे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्याल येथे 2016-17 या शैक्षणीक वर्षातील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष चौधरी होते. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, संस्थेचे सचिव प्रा.एन.एस. पाटील, सहचिव डॉ. डी.के. टोके, संचालीका अरूणाताई पाटील, संचालक किरण बेडाळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सी.एस.पाटील, उपप्राचार्या एस.एस. नेमाडे, उपमुख्याध्यापक आर.आर.पाटील, पर्यवेक्षक एन. व्ही महाजन, पर्यवेक्षीका एम.एम. धांडे, कार्यालयीन अधिक्षक आर.आर. गुळवे उपस्थीत होते.

कार्यक्रमात या विद्यार्थींनींचा झाला सत्कार
आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत ऐतिहासीक कामगीरी करणार्‍या जयश्री पवार, प्राची वानखेडे, नयन माळी, पोर्णीमा द्राक्षे यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक विभागातुन दहावीत प्रथम कचरे वैभवी , व्दितीय चौधरी धनश्री , एम.टी.एस. परिक्षेत पाटील रविंंद्र, शिंपी रविंंद्र, झोपे महेश यांचा सत्कार करण्यात आला. चित्रकला विभागातुन चौधरी श्रध्दा, कुरकुरे हर्षा, जाधव धनश्री यांचा सत्कार करण्यात आला. धनश्री जाधव, मानसी चौधरी यानी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगीरी केली तर करिश्मा पाटील, विशाखा साळूंंके, होमीका अत्तरदे, होमाली अत्तरदे, इश्वरी अत्तरदे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगीरी केल्या बदद्ल गौरव करण्यात आला. बारावीपरीक्षेतील गुणवंत काजल खोंडे, कोमल पाटील, किर्ती परदेशी, दिपाली बाविस्कर, तृषाली राठोड, जागृती साळुंंखे या विद्यार्थिनींंचा यावेळी सत्कार करण्यात आला. किर्ती परदेशी हिने तिन्ही शाखांमधुन प्रथम क्रमांक मिळविल्याने तिला रोख पारीतोषीक देण्यात आले. क्रीडा विभागातुन राधीका पाटील, करिश्मा भावसार, कोमल गायकवाड, किर्ती बावीस्कर, नमता भांडारकर, चंचल शर्मा, सुचेता भालेराव, पायल ठाकरे, दिपमाला चौधरी, मिनाक्षी बागुल, गौरी पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.