जळगाव : नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय येथे दंतराेगतज्ज्ञ डाॅ. सुयाेग साेमाणी यांच्या माैखिक अाराेग्य या विषयावर साेमिनार नुकताच झाला. यात माैखिक अाराेग्यावर मार्गदर्शन करण्यात अाले. विज्ञान मंडळातर्फे अायाेजीत कार्यक्रमात लेवा एज्युकेशन साेसायटीचे उपाध्यक्ष अरूण नारखेडे, प्रा. एन. एस. पाटील, संचालक किरण बेंडाळे, अाशालता नारखेडे, प्राचार्य चारूलता पाटील उपस्थित हाेते. डाॅ. साेमाणी यांनी पीपीटीद्वारे दातांची रचना, स्वच्छता व अाराेग्याची कशी काळजी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
युनिक उर्दू प्राथमिक शाळेत रुबेला लसीकरण मार्गदर्शन
युनिक एज्युकेशनल अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित युनिक उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत रुबेला लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक साबीर शाह होते. हर्षदा शिलेदार, समिरा तडवी, अनिता भदाणे यांनी रुबेला लसीकरणाबाबत मार्गदर्शनक करत कार्यक्रमास उपस्थित पालकांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिक उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.