नंदुबारात भाजपा पदाधिकार्‍यांचे लाक्षणिक उपोषण

0

नंदूरबार– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार भाजपा पदाधिकार्‍यांनी शहरातील दीनदयाल चौकात गुरुवारी सकाळी 11 वाजता लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ केला. खासदार डॉ.हिना गावी यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात उपोषण करण्यात येत असून स्थानिक स्तरावर होत असलेल्या उपोषणात मात्र भाजपचे आमदार डॉ.विजयकुमार गावित व आमदार उदेसिंग पाडवी अनुपस्थित असल्याचे दिसून आले.