नंदुरबारकरांचा जनता कर्फ्युला प्रतिसाद

0

नंदुरबार : शहरासह जिल्ह्यात जनता कर्फ्युचे जोरदार समर्थन करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळी 7 वाजेपासून शहरातील सर्वच रस्त्यांवर सन्नाटा पसरलेला आहे. शहरच काय पण ग्रामीण भागात देखील जनता कर्फ्यु स्वतःहून पाळला जात आहे, हे विशेष.