नंदुरबारचा लाचखोर लेखापरीक्षक जाळ्यात

0

नंदुरबार:- वरीष्ठ वेतन श्रेणीनुसार वेतन निश्‍चितीची पडताळणी करून बिल मंजुरीला पाठवण्यासाठी आठ हजारांची लाच घैताना नंदुरबार शिक्षण विभागाच्या वरीष्ठ लेखापरीक्षण कार्यालयातील लेखा परीक्षक ज्ञानदेव सोमा कचरे (42) यास आठ हजारांची लाच घेताना नंदुरबार एसीबीने रंगेहाथ अटक केली. नवापूर तालुक्यातील सोनखांबच्या 49 वर्षीय शिक्षकाने याबाबत तक्रार नोंदवली होती. नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संगीता पाटील व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.