नंदुरबार। जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतीष भरत वळवी यांना 20 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे, या कारवाईमुळे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, या बाबत अधिक माहिती अशी की,धुळे येथील अनुदानित शाळेला अनुदान मिळाले होते, अतिरिक्त अनुदानाच्या रकमेसाठी २० हजाराची मागणी करण्यात आली होती,या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती, त्यानुसार दि,19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पथकाने जिल्हा परिषद आवारात सापळा रचला होता, या जाळ्यात तक्रारदार यांच्या कडून 20 हजार रुपयांची लाच घेताना समाज कल्याण अधिकारी सतिष वळवी रंगेहात पकडले गेले, जिल्हा परिषदेच्या आवारात ही कारवाई करण्यात आली, या घटनेने जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे,