नंदुरबारजवळ ट्राला-चारचाकीत भीषण अपघात : तिघे ठार

नंदुरबार : भरधाव ट्रालाने चारचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार झाले तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात तळोदा रस्त्यावरील हॉटेल हायवेसमोर शुक्रवारी मध्यरात्री घडला.

तिघांचा जागीच मृत्यू
नंदुरबारकडून धमडाईकडे निघालेल्या इर्टीगा (जी.जे.15 सी.जी.0723) ला समोरून आलेल्या भरधाव ट्राला (क्र.जी.जे.18 ए.जे-1763) ने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले. शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात रेल्वे सुरक्षा दलातील जवान प्रशांत रमणभाई सोनवणे (40, रा.वलसाड. गुजरात), अनिल रामदास सोलंकी (35, हाटमोहिदा, ता.नंदुरबार, ह.मु.उधना, गुजरात) व हिरालाल सुभाष पवार (35, शहादा) यांचा मृत्यू झाला तर विशाल शरद पवार योगेश उर्फ अमृत नारायण सोनवणे (शहादा) हे जखमी झाले. अपघात प्रकरणी विशाल शरद पवार (रा.प्लॉट नं.1, शिरुड चौफुली, शांतीनगर शहादा) फिर्यादीवरून अज्ञात ट्राला चालकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 304 (3ख), 279,337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक अंकुश गावीत करीत आहेत.