जिल्हा आरोग्य अधिकारी: डॉ बोडखे
नंदुरबार: शहरातील चिरागगल्ली भागातील एका बालिकेचा विविध डोस घेतल्याने मृत्यू झाल्याची घडली. बालिकेचा मृत्यू लसीकरणमुळे झाला किंवा कसा याबाबत पडताळणी करण्यात येत आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडखे यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना दिली.
ते म्हणाले की, शहरात नियमित लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार माळीवाडा भागात असलेल्या केंद्रात दि 4 मार्च रोजी 27 बालकांना पेंटा व्हॅकसीन, पोलिओ असे एकत्रित डोस देण्यात आले, मात्र त्या दरम्यान एका बालिकेचा मृत्यू झाला असला तरी हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची पडताळणी करण्यात येणार आहे, त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशीही माहिती डॉ बोडखे यांनी दिली.