नंदुरबारमधील भगवती हॉस्पिटलला गुणवत्तेविषयी सर्वोच्च एन.ए.बी.एच मानांकन

0

नंदुरबार- शहरातील भगवती कान, नाक, घसा हॉस्पिटल व एन्डोस्कोपी सेंटरला रूग्णालय गुणवत्तेविषयी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च एन.ए.बी.एच मानांकन (प्रवेश स्तर) मिळाले आहे. अशा प्रकारचे मानांकन मिळविणारे नंदुरबार जिल्ह्यातील हे पहिलेच हॉस्पिटल आहे. कान-नाक-घसा व तोंडाचे कॅन्सर संबंधित रुग्ण सेवेत पाळले जाणारे निकष, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, तज्ञ डॉक्टर, इंफ्रॉस्ट्रक्चर सुविधा, शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध साधने, स्वछता इत्यादी गोष्टींचे काटेकोरपणे पालन भगवती हॉस्पिटलमध्ये करण्यात येत असल्याचा अहवाल दिल्ली येथील पथकाने भेट देऊन सादर केला होता. त्यानुसार भगवती हॉस्पिटलला हे मानांकन मिळाले आहे.