नंदुरबार: येथील वाघेश्वरी माता मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या बालाजी वेफरच्या गोडाऊनमध्ये पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला आहे. या ठिकाणी बालाजी वेफरच्या खाली कट्टयामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या, त्यांची किंमत 10 ते 12 हजार रुपये इतकी आहे. शहर पोलिसांनी ही कारवाई केली. नंदुरबार तालुका खेडरिया मार्केटिंग डीलरच्या नावाने हे गोडाऊन असून येथून होलसेल भावात वेफर्सची विक्री होते.या प्रकरणी डीलर गणेश पांडुरंग चौधरी यांना मुद्दे माला सोबत पकडण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.