नंदुरबार। शहरातील कै.बटेसिह रघुवंशी व्यापारी संकुलातील संगम बेकरीच्या बालाजी केक दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या आगीत दुकानातील बेकरीच्या सर्व वस्तू जळून राख झाल्या आहेत. त्यात पाव, खारी, केक आदी वस्तूंचा समावेश होता. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतरच नुकसानीचा खरा आकडा कळू शकतो. जुन्या नगरपालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या कै.बटेसिह भैय्या रघुवंशी व्यापारी संकुल उभारण्यात आले असून त्यात एका गाळ्यात संगम बेकरी फर्म चे बालाजी केकचे दुकान आहे,रात्रीतून या दुकानाला आग लागल्याने दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.