नंदुरबार : आमलाड येथील स्वाईन फ्ल्यूग्रस्त तरुणाचा नाशिक येथे उपचार घेत असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळोदा तालुक्यातील आमलाड येथील कृष्णा काशिनाथ वाघ ( कोळी ) वय 32 वर्ष या तरुणामध्ये स्वोईन फ्ल्यू ची लक्षणे दिसून आली होती, त्यामुळे उपचारासाठी त्यास नंदुरबार व त्या नंतर नासिक येथे दाखल करण्यात आले होते, या घटनेने आरोग्य विभाग देखील खळबळून जागे झाले होते, आमलाड गावात आरोग्य पथक दाखल होऊन तपासणी सुरू केली,कृष्णा कोळी यांच्या परिवारातील सदस्यांना देखील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, दरम्यान नाशिक येथे उपचार घेत असलेल्या कृष्णा काशिनाथ कोळी वय 32 वर्ष या तरुणाचा मृत्यू झाला आहे, नंदुरबार जिल्यात स्वाईनफ्ल्यू चा पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.