नंदुरबारला आयकर विभागाची छापेमारी सुरू

नंदुरबार। महाराष्ट्र गुजरात व मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातही आयकर विभागाने आपला मोर्चा वळविला आहे. आज बुधवारी सकाळ पासून या विभागाच्या पथकांनी धाडी टाकल्याने बेहिशोबी मालमत्ता जमवून ठेवलेल्या गब्बर लोकांना कडाक्याच्या थंडीतही घाम फुटला आहे. 

नंदुरबारसह जिल्हयात प्रतिष्ठीत लोकांच्या घरी व प्रतिष्ठानांमध्ये आयकर विभागाची चौकशी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. अजूनही कारवाई सुरु असून या धाडसत्रात काय निष्पन्न झाले त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही.